पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली व माळशिरस तालुक्यातील बोरगाव ,अकलूज येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी तळाची व मार्गाची पाहणी विभागीय आयुक्त शितल तेली उगले यांनी केली.
यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अप्पर आयुक्त तुषार ठोंबरे, सहाय्यक प्रांताधिकारी सचिन इथापे, विजया पागांरकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे श्री. औटी, कार्यकारी अभियंता अमित निमकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा नगर विकास प्रशासन अधिकारी योगेश डोके, , तहसीलदार सचिन लंगुटे,गटविकास अधिकारी अमोल जाधव उपस्थित होते.
यावेळी पालखी तळाची स्वछता, सपाटीकरण, चिखल होऊ नये म्हणून मुरूम टाकणे आणि पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी व्यवस्था करावी. वारी काळात वारकऱ्यांना मूलभूत व आरोग्य सुविधा मिळण्यावर भर देण्यात यावा. पालखीच्या
संपूर्ण मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तात्पुरती व फिरती शौचालये उपलब्ध करून स्वच्छतेसाठी मुबलक मनुष्यबळ तैनात ठेवावी, तसेच पालखी तळांवर अग्निशमन यंत्रणा सुसज्ज ठेवावी सूचना विभागीय आयुक्त शितल तेली उगले यांनी यावेळी दिल्या.

.jpg)
