सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
आपल्या लोकप्रिय दैनिकात कै. भजन गुरू. कै उर्मिला सुमंत यांच्या प्रथम पुण्यस्मरण पित्तर्थ जुळे सोलापूर गोविंदश्री मंगलकार्य येथे कै. उर्मिला सुमंत बाईंना श्रध्दांजली, आदरांजली, म्हणून "स्मृतीगंध " हा कार्यक्रम म्हणून भजन स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. भजन स्पर्धा हा कार्यक्रम रेणुका भजनी मंडळाचे मार्गदर्शक शोभाताई देशपांडे, रेणुका भजनी मंडळाचे माजी अध्यक्ष नमिता थिटे, शाकुंतल भजनी मंडळाचे अध्यक्ष मनिषा पाटील यांनी आयोजित केले होते.
या भजन स्पर्धेत 10 भजनी मंडळ सहभाग घेतला होता. कै उर्मिला सुमंत यांच्या कन्या गिरीजा सुमंत व सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सर्वानी आदरांजली वाहून कार्यक्रमास सुरूवात केली
या कार्यक्रमास माजी महापौर नलिनी चंदेले, गोविंदश्री च्या सौ रेखाताई शिवलिंग कांबळे, ऍड मानसी कुलकर्णी, गायिका सुजाता देशपांडे, शोभाताई देशपांडे, नमिता थिटे मनिषा पाटील सर्व मान्यवर उपस्थित होते.
रेणुका भजनी मंडळ कार्यक्रमाचे संयोजन असल्याने स्पर्धेत सहभागी झाले नाही. सुमंत बाईंना श्रध्दांजली म्हणून गणपती व गुरूचे भजन म्हणून भजन स्पर्धेच सुरूवात केली. या भजन स्पर्धेत सर्व स्पर्धकासाठी 10 मिनिटे वेळ दिला. त्यात एक गणपती व 1 गुरूचे भजन सादर करायचे होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड मानसी कुलकर्णी यांनी केले.या भजन स्पर्धेसाठी परीक्षक संगीत विशारद गायिका सुजाता देशपांडे या लाभल्या.
एल आय सी विमा प्रतिनिधी 8329354008
या स्पर्धेत
1) प्रथम क्रमांक समर्थ भजनी मंडळ आसरा.
2) द्वितीय क्रमांक चिंतामणी भजनी मंडळ.
3) त्रुतीय क्रमांक रूक्मिणी भजनी मंडळ.
*उत्तेजनार्थ अष्टभुजा भजनी मंडळ.
या👆सर्व विजेते स्पर्धकांना माजी महापौर सौ नलिनी चंदेले व सौ रेखाताई शिवलिंग कांबळे यांच्या हस्ते शाल, बुके, ट्रॉफी व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.
1) प्रथम क्रमांकला 1000 रू रोख, शाल, बुके व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले
2) द्वितीय क्रमांकाला 75० रू रोख, शाल, बुके, ट्रॉफी.
3) त्रुतीय क्रमांकाला 500 रु. रोख, शाल, बुके ट्रॉफी
उत्तेजनार्थला 350 रू. रोख. शाल, बुके ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शोभाताई देशपांडे यांनी केले. सर्व मान्यवर पाहुण्यांची ओळख नमिता थिटे यांनी करून दिली. शेवटी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मनिषा पाटील यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शोभाताई देशपांडे नमिता थिटे मनिषा पाटील सुनंदा गोखले सौ येमुलवार, अनिता कुलकर्णी, रेखा पाटील, किरण उपळाईकर, प्रतिभा सरदेशमुख, संध्या मळेकर, विजयालक्ष्मी कुलकर्णी यांनी परीश्रम घेतले.


