पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीचे वतीने कोरिडोर आरिष्ट निवारणार्थ श्री. पुरूषोत्तम तथा विष्णुयागाचे आयोजन करण्यात आले आहे.
सामर्थ्य आहे चळवळी चे !
जो जो करील तयांचे.!
परंतु तेथ पाहिजे !
अधिष्ठान भगवंतांचे.!!
पुरातन व पवित्र पंढरी क्षेत्राचे मांगल्य नष्ट करु पाहणाऱ्या,
पंढरपूर कोरिडोर प्रकल्पाला आपण सर्वांनी, सनदशीर मार्गाने अत्यंत हिरिरिने विरोध केला आहे.आपली बाजू सत्याची व न्यायाची असल्याने आजवर सरकार आपल्या शी चर्चा करायला धजावले नाही.
स्वाक्षरी अभियान, प्रारुप मतदान, धरणे, सत्याग्रह, निर्धार मेळावा सभा, अभूतपूर्व मोर्चा, शासकीय पडाक जागांची शोधयात्रा, विक्रमी संख्येने हरकती व सुनावण्या, या सर्वांतून आपण प्रखर जनआंदोलन घडवले आहे.सध्या अत्यंत पवित्र असा अधिकमास असल्याने आपल्या कार्याला ईश्वरी अधिष्ठान मिळवणेसाठी,
"कोरिडोर अरिष्ट निवारणार्थ श्री.पुरुषोत्तमयाग तथा श्रीविष्णुयाग " करणेचे योजिले आहे. सर्व बाधित बांधवानी यात तनमनधनाने सहभागी व्हावे अशी नम्र विनंती आहे.
सदर महायज्ञ "हिंदुमहासभा भवन "या ठिकाणी दि. 09/06/2026 ते 15/06 /2026 या काळात, प्रतिदिन सकाळी साडेसात ते अकरा या काळात होणार आहे.समारोप दि. 15/06 /2026 या दिवशी,"अवभृत स्नान "ची मोठी मिरवणूक निघणार आहे.
तरी सर्वांनी मनःपूर्वक सहभाग नोंदवून ईशकृपा प्राप्त करून आपल्या आंदोलनास विजय मिळवावा.पंढरपूर नगरीचे पावित्र्य व प्राचीनत्व मोडू नये असे वाटणार्या व बाधित नसणारे व्यक्ती ही या देवकार्यात सहभागी होवू शकतात.
तरी सर्वांनी तनमनधनाने सहभागी व्हावे असे आवाहन बचाव समितीचे अध्यक्ष, अभयसिंह इचगांवकर, ऊपाध्यक्ष, ह. भ. प. माउली महाराज गुरव व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.


