पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे वस्तूवरील अनियंत्रित एमआरपीविरुद्ध देशभर आंदोलन सुरू असून त्याचाच भाग म्हणून जिल्हाभर नागरिकांच्या स्वाक्षरीची मोहीम हाती घेतली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली
दैनंदिन वापरातील वस्तुंवर अवाजवी एमआरपीविरुद्ध देशभर आंदोलन सुरू आहे. ते अधिक तीव्र करून देशभरातील नागरिकांच्या स्वाक्षरची मोहीम हाती घेण्यात आली आहे.या आंदोलनाचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वाक्षरी मोहीम सुरू केलेली आहे.यास नागरिकांचाही उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
पंढरपूर शहरातील श्री दत्त घाट परिसर,तुळशीवृंदावन परिसर, रेल्वे स्टेशन जवळ,श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात निकते मेडिकल,बस स्थानक परिसर सावरकर पथ,हरिदास वेस परिसर,घोंगडे गल्ली,भोसले चौक,इ.अनेक भागात सुरू आहे.गोपाळपूर,भाळवणी, इ ठिकाणी सुरू आहे.
या स्वाक्षरी मोहीमेत जिल्हा सचिव सुहास निकते,उपाध्यक्ष विनय उपाध्ये,तालुका अध्यक्ष नंदकुमार देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव महेश भोसले, सहसचिव आझाद अल्लापूरकर,कार्यकारिणी सदस्य मंगेश देशपांडे,अमोल अभंगराव, सागर शिंदे, सागर कोळेकर, पंढरपूर शहरात,तालुक्यात एमआरपीविरुद्ध आंदोलनाचा एक भाग म्हणून विविध ठिकाणी स्वाक्षरी मोहीम सुरू केलेली आहे.
शहरातील श्री दत्त घाट मंदिर परिसरात, तसेच तुळशीवृंदावन रेल्वे स्टेशन जवळ, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात निकते मेडिकल, बस स्थानक परिसर सावरकर पथ परिसरात, हरिदास वेस परिसर इ.अनेक भागात सुरू आहे.
या स्वाक्षरी मोहीमेत जिल्हा सचिव सुहास निकते,उपाध्यक्ष विनय उपाध्ये,तालुका अध्यक्ष नंदकुमार देशपांडे उपाध्यक्ष प्रशांत माळवदे, यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव महेश भोसले,सहसचिव आझाद अल्लापूरकर,मंगेश देशपांडे, अमोल अभंगराव, सागर शिंदे, सागर कोळेकर, पवार, सुमित पारखे,विक्रांत कासेगावकर, किशोर शिंदे,डाॅ.प्रशांत ठाकरे,जिल्हा सदस्य संतोष उपाध्ये, इ.कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.


