अक्कलकोट प्रतिनिधी तेज न्यूज
अक्कलकोट मध्ये एसीबीची मोठी कारवाई; १.२० लाखांची लाच स्वीकारताना दोन पोलिसांसह तिघे जाळ्यात अडकले असून, याप्रकरणी उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांची तडकाफडकी पोलीस मुख्यालयात बदली का..? यामुळे जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान उत्तर पोलीस ठाण्याशी संबंधित एका प्रकरणात स्कॉर्पिओ वाहन व मोबाईल परत देण्यासाठी तसेच तक्रारदाराच्या नातेवाईकांना मदत करण्याच्या मोबदल्यात १ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई केलेली होती. या कारवाईत अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचारी आणि त्यांच्यावतीने काम करणारा एक खासगी व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.
या प्रकरणातील आरोपींमध्ये पोलीस हवालदार राजशेखर रामचंद्र कोळी, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मीकांत दत्तात्रय देडे आणि खासगी व्यक्ती आकाश शरण्णाप्पा काडरामे यांचा समावेश आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या वडिलांचे आणि काकांचे नाव गुन्ह्यात टाकून अटक करण्याची भीती दाखवण्यात आली. तसेच वाहन आणि मोबाईल परत मिळवून देण्यासाठी व नातेवाईकांना मदत करण्याच्या बदल्यात सुरुवातीला १ लाख ४० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. नंतर तडजोडीनंतर ही रक्कम १ लाख २० हजार रुपयांवर निश्चित करण्यात आल्याचे एसीबीच्या तपासात निष्पन्न झाले.
एसीबीने १५ जून रोजी तक्रारीची पडताळणी केली असता लाचेच्या मागणीची पुष्टी झाली. त्यानंतर त्याच दिवशी सापळा रचण्यात आला. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यासमोर आरोपी आकाश काडरामे याने पोलिस कर्मचाऱ्यांच्या वतीने १ लाख २० हजार रुपयांची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणात संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या प्रकरणातील आरोपींमध्ये पोलीस हवालदार राजशेखर रामचंद्र कोळी, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मीकांत दत्तात्रय देडे आणि खासगी व्यक्ती आकाश शरण्णाप्पा काडरामे यांचा समावेश असून, यातील पोलीस कर्मचारी हे गेल्या वर्षी दक्षिण पोलीस ठाण्यात कार्यरत होते. यापैकी आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन पळालयाचे वृत्त आहे.
या प्रकरणातील तक्रारदाराने सदर पोलीस आरोपींचे अवैद्य धंद्यामध्ये भागीदार, आणि कोट्यावधीची मालमत्ता असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे. दरवर्षी पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतात, त्याच त्याच तालुक्यात बदली मुळे असे प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे.

.jpg)
