श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात स्वामी दर्शन व समितीच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर मा.न्यायमूर्ती श्रीमती स्वप्ना जोशी यांचे मनोगत.
श्रीशैल गवंडी अक्कलकोट प्रतिनिधी तेज न्यूज
येथील श्री वटवृक्ष निवासी श्री स्वामी समर्थांचे ब्रीद वाक्य "हम गया नही जिंदा है" सर्व स्वामी भक्तांसाठी हाच तर महामंत्र आहे. जोवर श्वासात श्री स्वामी समर्थ आहे तोवर भक्तांनी संकटाला सांगावं हम गया नही जिंदा है, कारण स्वामींचे हे ब्रीद वाक्यच आपणास जीवनात संकटांशी लढण्याची प्रेरणा देतात. श्री स्वामी समर्थावरील भक्तांची भक्ती व श्रद्धा ही स्वामींच्या विशाल वटवृक्षा सारखी कधीही न संपणारी असावी आणि आपण सारे स्वामी भक्त त्या स्वामींवर असलेल्या भक्ती व श्रध्देच्या वटवृक्षाला मनापासून उभारी द्यावी असे मनोगत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तसेच मानवाधिकार आयोगचे सदस्य श्रीमती स्वप्ना जोशी यांनी व्यक्त केले.
ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास सहकुटूंब भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी माजी न्यायमूर्ती श्रीमती स्वप्ना जोशी व कुटूंबियांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी माजी न्यायमूर्ती श्रीमती स्वप्ना जोशी बोलत होते.
पुढे बोलताना माजी न्यायमूर्ती श्रीमती स्वप्ना जोशी म्हणाले की दुःख आलं की स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, मग आपण स्वामी भक्तीच्या बळावर म्हणायचं स्वामी हम गया नही जिंदा है कारण आपलं अपयश आलं ही तर स्वामींची परीक्षा आहे. स्वामी आपली परिक्षा हमखास देतात हे देऊळ बंद २ चित्रपटाच्या माध्यमातून लवकरच आपणा सर्वांना अनुभवता येणार आहे.देऊळ बंद हा तर एक चित्रपट आहे परंतू भाविकांनी आपल्या मनातील श्रद्धेचं देऊळ नेहमी उघडं ठेवावं असेही मनोगत माजी न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांनी व्यक्त करून आज येथे झालेल्या सन्माना प्रीत्यर्थ मंदिर समितीचे आभार मानले व मंदिर समितीच्या कार्यास शुभेच्छा व्यक्त केले.
यावेळी मंदिर समितीचे प्रथमेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशांत काळे, विपुल जाधव, सागर गोंडाळ, स्वप्निल मोरे, सुरवसे आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.


