मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
इरा पारवडे ही एक लोकप्रिय मराठी बालकलाकार आहे. तिने प्रामुख्याने टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
इरा पारवडे हिने स्टार प्रवाहावरील गाजलेली मालिका 'प्रेमाची गोष्ट' मध्ये सई ही महत्त्वाची भूमिका साकारली होती. या मालिकेतील तिच्या निरागस अभिनयामुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली.
इरा पारवडे हिने 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे यांसारख्या दिग्गज कलाकारांन सोबत काम केले आहे. सईच्या भूमिकेसाठी तिला प्रेक्षकांकडून खूप दाद मिळाली. आणि सईची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
तसेच 'लपंडाव' या मालिकेत सुद्धा इरा ने काम केले आहे. ज्या मध्ये तीने 'कुल्फी' नावाची भूमिका साकारली आहे.
बाप्या या आगामी मराठी चित्रपटातील इरा- ही एक बालकलाकार आहे. या चित्रपटात इरा महत्त्वाच्या भूमिकेत आहे. इरा हिने टेलिव्हिजन मालिकांमधून कामाची सुरुवात केली. तिने तिच्या अभिनयाने सर्वांना आपलंस केले. तिच्या मेहनतीने उत्कृष्ट अभिनयाने तिने लवकरच यशाचे शिखर गाठले आहे.
या पाठीमागे तिच्या आई व आजोबांचे खूप मोठे श्रेय आहे.


