अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
कोल्हापूर येथील स्वामी भक्त, तथा श्री स्वामी समर्थ भक्त मंडळाचे संचालक विरेश पांचाळ यांच्या निवासस्थानी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी नुकतेच आपल्या मित्र परिवारा सोबत कोल्हापूर येथील स्वामी भक्त विरेश पांचाळ यांच्या निवासस्थानी सदीच्छा भेट दिली.
यावेळी स्वामी भक्त विरेश पांचाळ व कुटूंबियांचा श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांनी श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मधील स्वामी सेवेबद्दल नगरसेवक महेश इंगळे, यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन विरेश पांचाळ यांनी यथोचित सत्कार केला.
यावेळी श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ संस्थेचे अध्यक्ष नारायण बुधले,प्रकाश चव्हाण, जयसिंगराव जाधव, साळुंखे सर, बापू खोत, बाबुराव पवार, घाडगे सर, सचिन बुधले, प्रा.शिवशरण अचलेर सर, श्रीकांत झिपरे, अमर पाटील, सुनील पवार, सोमनाथ सुतार, सुरेश वाले , अंकुश केत, बाळासाहेब एकबोटे, श्रीशैल गवंडी, सागर गोंडाळ, तुषार मोरे, स्वामीराव मुसळे, रमेश शिंदे, कुमार हत्तुरे, मनोज जगताप , नामदेव माने , संदीप पंडित, विश्वनाथ देवरमनी ,न्यानेश्वर भोसले आदींसह विरेश पांचाळ व कुटूंबीय उपस्थित होते.


