पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यात काल रात्रीच्या सुमारास प्रशांत डगळे (भा.पो.से.) सहायक पोलीस अधीक्षक पंढरपूर यांना मौजे खर्डी येथील खताळ वस्ती येथे काही इसम रमी नावाचा पत्त्याचा जुगार खेळत असल्याची बातमी मिळाल्याने पोहेकॉ सर्जे, पोकॉ हुलजंती, पोकों माने, पोकॉ भंडरवाड, पोकॉ सावंत, पोकॉ कुचेकर, पोकॉ साठे, पोकॉ लोखंडे, पोकॉ सुर्यवंशी, पोकॉ लोंढे यांना सदर ठिकाणी जावून बातमीतील माहीती प्रमाणे खात्री करून कारवाई करणेबाबत आदेशीत केले.
त्याप्रमाणे इकडील तपास पथकासह वरील पोलीस अंमलदार सदर ठिकाणी गेले असता, त्यांना एका आंब्याचे झाडाखाली मोकळया जागेत लाईटच्या उजेडात काही इसम गोलाकर बसुन रमी नावाचा पत्याचा जुगार खेळत असताना दिसल्याने त्यांना गराडा घालून जागीच पकडले. ती वेळ २०/४५ वा. ची होती. त्यांचे समोरच वेगवेगळया दराचे नोटा पडलेल्या दिसल्या. सदर इसमांना त्यांचे नाव पत्ता विचारता,
१) संतोष सुखदेव खताळ वय ३२ वर्षे रा. खताळवस्ती, खर्डी, ता. पंढरपूर २) फिरोज इलाही आतार, वय ३८ वर्षे, रा. खर्डी, ता. पंढरपूर, ३) मारूती नारायण अभिमंत वय ३६ वर्षे, रा.खर्डी, ता. पंढरपूर, ४) समाधान भारत वाकडे वय ३५ वर्षे, रा. खर्डी, ता. पंढरपूर, ५) अस्लम दाउद शेख, वय ३२ वर्षे, रा. शेळवे, ता. पंढरपूर, ६) कुलजित मारूती देशमुख वय ४०, रा. कासेगाव, ता. पंढरपूर ७) सिताराम मारूती चव्हाण वय ३८ वर्षे, रा. खर्डी, ता. पंढरपूर, ८) दिगंबर लक्ष्मण पवार वय ५५ वर्षे, रा. उंबरगाव, ता. पंढरपूर अशी नावे असल्याचे सांगितले.
तसेच त्यांचेकडे अधिक चौकशी करता, सदरची जागा संतोष सुखदेव खताळ याचे मालकीची असून सदर जागा जुगार खेळण्याकरीता वापरण्यास दिल्याचे समजले. त्यांच्या कब्जात ११,१७०/- रू. रोख, ०७ मोबाईल, पत्याची पाने, ०२ चारचाकी वाहन, ०३ दुचाकी मोटार सायकल असा एकुण १३,६५,१७०/-रूपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने वरील आरोपी नं. ०१ ते ०८ यांचेविरूध्द पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही चालू आहे.
सदरची कारवाई प्रशांत डगळे सहाय्यक पोलीस अधीक्षक (भा.पो.से.) पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सर्जे, पोकों हुलजंती, पोकॉ माने, पोकॉ भंडरवाड, पोकॉ सावंत, पोकॉ कुचेकर, पोकों साठे, पोकॉ लोखंडे, पोकॉ सुर्यवंशी, पोकॉ लोंढे यांनी पार पाडलेली आहे.

