पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर महसूल विभागाशी संबंधित नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी महसूल विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत आज दिनांक 14 रोजी पंढरपूर तालुक्यातील चळे व तुंगत मंडळातून 1 हजार 526 विविध सेवा व विविध दाखले देण्यात आले असल्याची माहित तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली.
या अभियानातंर्गत चळे व तुंगत येथील शिबिरात निकाली काढण्यात आलेले फेरफार 108, सातबारा मधील दुरुस्ती 16, डिजिटल सातबारा 384, 8 अ उतारे 312, प्रमाणपत्रे 469, एक खिडकी व्यवस्थेअंतर्गत निकालात काढण्यात आलेले अर्ज 05, भूसंपादन प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्यावत करण्यात आलेली प्रकरणे 17, अद्यावत अभिलेख 59, वर्ग दोन जमिन वर्ग एक करण्याबाबत कार्यवाही 16, सामाजिक योजना 49, शिधापत्रिका 11, कृषी यांत्रिकीकरण, फलोत्पादन व कृषी सिंचन योजना 50, आभा कार्ड एच.बी, तपासणी व औषधोपचार 20, ई- मोजणी फेरफार नकाशा 10 आदी सेवा व दाखले देण्यात आले.
यामध्ये चळे मंडळातून 731 तर तुंगत मंडळातून 795 असे एकूण 1 हजार 526 विविध सुविधा एकाच छताखाली पुरवण्यात आल्याचे तहसीलदार सचिन लंगुटे यांनी सांगितले. पंढरपूर तालुक्यातील संबधीत मंडळातील जास्तीत जास्त नागरिकांनी या महाराजस्व समाधान शिबिर मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार लंगुटे यांनी केले आहे.
यावेळी आमदार अभिजीत पाटील,जि.प.सदस्य गितांजली साळुंखे, पं.स.सदस्य अतुल गायकवाड, सरपंच ज्ञानेश्वर शिखरे, अमृता रणदिवे, प्रांताधिकारी सचिन इथापे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन हरीश गायकवाड, नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड, दीपक शिंदे आदीसह मंडळाधिकारी, तलाठी, ग्रामस्थ उपस्थित होते.


