मुंबई प्रतिनिधी प्रमोद सूर्यवंशी तेज न्यूज
समृद्धी पर्यटन सांस्कृतिक विकास सेवा ट्रस्ट (संस्था ) मुंबईच्या वतीने मुंबईतील अशोक सावंत हॉल, समतानगर कांदिवली येथे राज्यस्तरीय भव्य दिव्य पुरस्कार वितरण आणि कला सादरीकरण सोहळा रविवार दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी २-३० या वेळेत आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब तोरस्कर असून संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अभिनेत्री व समाजसेविका मीनाक्षी पाखरे स्वागताध्यक्षा असतील . या कार्यक्रमास आमदार प्रकाश दादा सुर्वे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रीन्डलेज फार्मासिटिकलचे चेअरमन रामकृष्ण कोळवणकर करणार आहेत.
तसेच पोलीस इन्स्पेक्टर मंगेश नाईक, समाजसेविका डॉ. अल्का नाईक ,साहित्यिक रावसाहेब घोडेराव, संस्थेचे सचिव महेश महादेव पाखरे, कवी अशोक मोहिते, संतोष सोनवणे,विजय आगवणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला राज्यभरातून सांस्कृतिक ,सामाजिक, पर्यटन, साहित्यिक व सहकार या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जवळपास १०० व्यक्तींना सन्मानचिन्ह , सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान अभिनेत्री व समाजसेविका मीनाक्षी महादेव पाखरे यांनी केले आहे .

