करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
श्री सद्गुरू भजलिंग महाराज ट्रस्ट करकंब यांच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे श्री भजलिंग महाराज चंदन उटी आणि अक्षयतृतीया निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पसायदान या विषयावर तीनदिवसीय प्रवचनमालेवर बोलताना जयवंत महाराज बोधले यांनी सांगितले.
सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून प्रवचनाला सुरुवात झाली.पसायदान या विषयावर सांगताना सांगितले की आपण आपल्या जीवनात सद्गुरूंची कास धरावी.सद्गुरु प्रसन्न होण्यासाठी जे काही करता येईल ते करायला मागेपुढे पाहायच नाही.कोणतही दान देताना प्रसन्न भावनेनं द्यावं.दान देत असताना त्यामध्ये व्यवहार नसावा,यावर अनेक दृष्टांत देत दान किती महत्त्वाचे आहे हे लक्षात आणून दिले,नाम हे किती महत्त्वाचे असताना सांगितले शंभर काम सोडा जेवण करा,हजार काम सोडा स्नान करा,लाख काम सोडा दान करा,कोटी काम सोडा नामस्मरण करा,इतकं नामस्मरणाच महत्त्व आहे.दान देताना हेतू शुद्ध असला तर ते दान सार्थकी होत.तेंव्हा आयुष्य जगत असताना प्रत्येकाचे दिवस सारखे नसतात त्यामुळे दानाची आवड निर्माण होणे आवश्यक आहे.दुसऱ्याच्या सुखाने जे सुखी होतात तेच खरे संतच असतात.पसायदान या नऊ ओव्या जरी आयुष्यात कळाल्या तरी आयुष्याच सार्थकी झाल्याशिवाय राहणार नाही सांगत सद्गुरू भजलिंग महाराज,संत माणकोजी बोधले महाराज यांच्या कृपाशीर्वादाने चाललेल्या या प्रवचनमालेची सांगता झाली.
यावेळी करकंब,भोसे,तुळसी,तसेच पंचक्रोशीतील भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रवचनानंतर भजलिंग महाराजांची चंदन उटी सर्वांना वाटप करण्यात आली.
प्रवचनमाला यशस्वी करण्यासाठी भजलिंग महाराज ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब वास्ते संजय दुधाने श्रीनिवास देशपांडे विद्याताई वास्ते,भुषण वास्ते, तसेच कविंद्र रेडे पाटील ज्ञानेश्वर दुधाणे आदींनी अधिक परिश्रम घेतले.

