पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील प्रसिद्ध वृत्तपत्रलेखक, कथाकथनकार, साहित्यिक, नाट्यकर्मी, खेळाडू व आदर्श शिक्षक अशा अनेक भूमिकातून पंढरपूरच्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कार्य केले अशा स्व.आप्पासाहेब चव्हाण यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना जिल्हास्तरीय पुरस्कार - २०२६ देण्यात येणार आहेत. रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल, हार व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून या पुरस्कारासाठी जिल्हा स्तरावरावरून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
१)साहित्यिक क्षेत्रातील पुरस्कारासाठी साहित्यिकाने आपल्या साहित्यकृतीच्या दोन प्रती बरोबर छायाचित्र व आपले परिचय पत्र पाठविणे आवश्यक आहे.
२)सामाजिक व
३)शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कारासाठी परिचय पत्र व कार्याचा आढावा पाठविणे आवश्यक आहे. स्व. आप्पासाहेब चव्हाण सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने ०४ मे, २०२६ रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या कार्यक्रमात मान्यवरांच्या शुभहस्ते सदर पुरस्कार दिले जाणार आहेत.
तरी सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील व्यक्तींनी आपले प्रस्ताव अमरसिंह आप्पासाहेब चव्हाण ( 9822369292 / 9834726747 ), 'वैष्णव' सदन, लक्ष्मी नगर, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय चौकाजवळ, पंढरपूर :- 413304 जिल्हा :- सोलापूर या पत्त्यावर २० एप्रिल, २०२६ पूर्वी पोहोचतील असे पाठवावेत.
अधिक माहितीसाठी कवी रवि वसंत सोनार - ९९२२५१४३००, डॉ.सचिन लादे - ७५८८२१६५२६ व मंदार केसकर - ९४२२३८०१४६ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अमरसिंह चव्हाण, अमोल चव्हाण व प्रताप चव्हाण यांनी केले आहे.

