भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड भाळवणी चेअरमन कल्याणराव काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहन 2026 2027 या सीझनचा तोडणी वाहतूक कराचा शुभारंभ करण्यात आला आहे.
अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आज ऊस वाहतूक ट्रॅक्टर मालक रवींद्र मोरे मुंडेवाडी काकासाहेब पवार महूद रत्नाकर गायकवाड पोहरगाव प्रवीण पाटील आवे नागनाथ रेडे सुधीर भोसले महादेव काळे यांच्या शूभहस्ते करण्यात आला.
यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन भारत नाना कोळेकर ऊस तोडणी वाहतूक कमिटीचे चेअरमन मोहन बापू नागटिळक, कारखान्याचे संचालक सुरेश बापू देठे युवराज दगडे, सुनील पाटील, अमोल माने, अरुण नलवडे, ज्योतीराम पोरे, कारखान्याचे जनरल मॅनेजर साळुंखे मुख्य शेती अधिकारी देशमुख ऊस पुरवठा अधिकारी हरिभाऊ गिड्डे , केनयार्ड सुपरवायझर विजय सटाले , कामगार संघटनेचे अध्यक्ष बंडू पवार , अधिकारी , कामगार,ऊस उत्पादक, वाहतूक दार, शेतकरी हितचिंतक उपस्थित होते.

