पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
चित्रकला हे मनाला शांतता देऊन एकाग्रता वाढवते. निरीक्षण शक्ती तिक्ष्ण करते व माणूस तणामुक्त होतो या उद्देशाने श्री रुक्मिणी विद्यापीठ संचलित मातोश्री ईश्वराम्मा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज पंढरपूर येथे " रंगोत्सव" या कार्यक्रमांतर्गत सावित्रीबाई फुले चित्रकला महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. सचिन घंटे सर यांचे निसर्गचित्राचे प्रात्यक्षिक आयोजित केले होते.
या प्रात्यक्षिकादरम्यान सचिन घंटे म्हणाले की चित्रकला ही मानवाच्या मानसिक व भावनिक विकासासाठी महत्त्वाची असुन रंगातून आपल्या भावना व्यक्त करून आपल्या मनावरचा ताण कमी करता येतो. असे सांगून चित्रकला हे केवळ छंद नसून करिअरचा उत्तम पर्याय आहे. यामध्ये सुद्धा उत्तम संधी असल्याचे सांगितले.सचिन घंटे यांनी रेखाटलेले निसर्गचित्र हे या कलेचे उत्तम उदाहरण आहे.
प्रशालेतील मुलांना या चित्रातून एक अद्भुत चमत्कारच वाटला. विद्यार्थी उत्सुकतेने रंग मिश्रण व रंगाचे चमत्कार पहात होते.तर चित्र पूर्ण होताच विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. चित्र सचिन घंटे यांनी रेखाटलेले निसर्ग चित्र प्रशालेच्या प्राचार्या नंदिनी गायकवाड यांचे कडे भेट म्हणून दिले.
शेवटी मुलांनी आनंदाचे व प्रेमाचे प्रतीक असलेल्या रंगपंचमी हा सण पारंपारिक मातीचे कोरडे रंग व पाणी याचा वापर करून पर्यावरण पूरक रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करून कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमासाठी प्राचार्या नंदिनी गायकवाड. शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी बोडके यांनी केले.तर इरफान शेख यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी कलाशिक्षक पांडुरंग शिंदे ,पुंजाजी ढोले, अभिजीत कोष्टी . सोनाली खोत यांनी विशेष परिश्रम घेतले.


