सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटी व विणकर बाग प्रभात मंडळाने महिला दिन साजरा केला. हा कार्यक्रम साखर पेठेतील विणकर बागेत सकाळी 8 वाजता आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नूतन नगरसेवक प्रवीण दर्गोपाटील, लायन रिजन चेअरमन ॲड.श्रीनिवास कटकुर , डॉक्टर प्रकाश घाटोळे, योग शिक्षक अवशेकर , ॲड.आर जी मेत्रस , लायन अध्यक्ष मोहन भूमकर मंचावर उपस्थित होते.
सकाळचे शुगर तपासणी व बीपी तपासणी शिबिर आयोजन केले आहे, तसेच टी-शर्ट सुद्धा सभासदांना देण्यात आले आहे.
या कार्यक्रमास वनराज बंडी, विजयकुमार दासरी, शरदचंद्र दासरी, नागेश कन्ना, बाबू चव्हाण, श्री सुरेश श्रीगिरी, अशोक हबीब, शंकर कनकी, उपस्थित होते. यावेळी महिला दिना बद्दल अध्यक्ष मोहन भुमकर यांनी माहिती दिली. आणि सर्वांचे आभार मानले.


