बारामती प्रतिनिधी तेज न्यूज
स्व. अजितदादा यांच्या स्मरणार्थ ‘बारामती ॲग्रो कंपनी’च्या माध्यमातून श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल रुख्मिणी संस्थानसाठी सेवा म्हणून दोन ॲम्बुलन्स देण्यात आल्या. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार (काकी) यांच्या हस्ते या ॲम्बुलन्स संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. जळगावकर महाराज यांच्याकडं सुपूर्द करण्यात आल्या.
अजितदादांनी शेवटच्या श्वासापर्यंत लोकांसाठी काम केलं, दादांचं हेच कार्य आणि विचार यातून प्रेरणा घेऊन या ॲम्बुलन्स देण्यात आल्या. वर्षभर पंढरपूरला श्री विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आणि स्थानिक नागरिकांनाही या ॲम्बुलन्सच्या माध्यमातून निश्चितच चांगली सेवा देता येईल. यावेळी बाबा (राजेंद्रदादा पवार) आणि योगेश रणदिवे उपस्थित होते.

