आमच्यावर बोलायला पालकमंत्र्यांना यावं लागतंय - भगीरथ भालके
भंडीशेगाव प्रचारसभेत भालकेनी घेतले कल्याणराव काळेला फैलावर
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अंतिम टप्प्यात आले आहेत. यामध्ये पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल परिवारामध्ये विभागणी झाली होती. परिवाराचे तीन विभाग पडले होते. त्यामधील माढ्याचे आ.अभिजीत पाटील आणि विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांचे वेगवेगळे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. ही बाब पंढरपूर तालुक्यातील कार्यकर्त्यांना पचनी पडत नव्हती. वरील दोघांनी युती करून निवडणूक लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यातून धरला जाऊ लागला होता. यामुळे त्यांनी युती करण्यात आली असल्याचे जाहीर करून टाकले होते. त्या युतीचे रूपांतर पाठिंबा देण्यापर्यंत गेले आहे. वाखरी जिल्हा परिषद गटातील उमेदवार हे आ.अभिजीत पाटील यांच्या गटाचे आहेत. या उमेदवारांना भालके गटाचे उमेदवार संग्राम गायकवाड यांनी भंडीशेगाव येथील सभेमध्ये उपस्थित राहून पाठिंबा व्यक्त केला आहे. त्यामुळे उमेदवार मयुरी बागल यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला आहे.
भंडीशेगाव येथे संयुक्त प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विठ्ठलची माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी थेट सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्यावर आग पाकड करीत त्यांच्या राजकीय कटकारस्थानाचा पाढा उपस्थित विठ्ठल परिवाराच्या कार्यकर्त्यासमोर मांडला. केवळ विठ्ठल परिवाराच्या नावाखाली एकत्रित येण्याची भाषा बोलायची आणि वेळ आल्यानंतर वेगळी भूमिका घ्यायची हेच त्यांनी अनेक वेळा केल्याचे आपणास पहावयास मिळाले आहे. स्वर्गीय भारत नानांच्या निधनानंतर आम्ही आपणाला वडीलधारी या नात्याने कायम सन्मान देत आलो होतो. मात्र आपण ठरलेली भूमिका न स्वीकारता कायम वेगळी भूमिका घेऊन मला अडचणीत आणण्याचा मोठा प्रयत्न केला असल्याचे जाहीर केले आहे. गळ्यात घड्याळाचा पंचा घालायचा आणि उमेदवारी फॉर्म मात्र कमळाचा भरायचा. असला डाव खेळायला नको होता. असेही भगीरथ भालके यांनी यावेळी सांगितले. ज्या सरकारने घरकुल धारकांना ५०हजार रुपयाची जादा अनुदान देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचबरोबर प्रत्येक घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचे आश्वासन हे दिले होते त्या आश्वासनाचे नेमके काय झाले? असा सवाल ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख भगीरथ भालके यांनी सरकारला स्पष्टपणे विचारला आहे.
याप्रचार सभेमध्ये माढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये बोलताना सांगितले की, वाखरी जिल्हा परिषद गट हा हॉटस्पॉट आणि चर्चेतील आहे. या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण इच्छुक होते. मात्र घड्याळाचा पंचा गळ्यात घालून कमळ घेतलं. असाही एक प्रकार पहावयास मिळाला आणि या ठिकाणी असलेल्या यलमर यांच्यावर अन्याय झाला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात. परंतु हल्ली आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मात्र कोणत्याही गल्लीबोळात फिरून या निवडणुकांमध्ये ही लक्ष घालत आहेत. यामुळे आमच्यासाठी पालकमंत्र्यांना यावं लागतं हीच आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. असे सांगत निधी मिळणार नसल्याची भीती दाखवली जात आहे. त्यामुळे पालकमंत्री साहेब आपण जरा सबुरीने घ्यावे असा सल्ला ही आमदार अभिजीत पाटील यांनी यावेळी दिला. आम्ही तुमच्याकडे येत असताना स्वतःला उमेदवारी मागण्यासाठी येत नसून मतदारसंघातील लोकांच्या हिताची कामे आणि विकास निधीसाठी यत असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. मागील पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये गणामध्ये पराभूत झालेल्या समाधान काळे यांना आता गटाची उमेदवारी दिली आहे. असे उपयोजित पणे सांगत त्यांचा आपण या निवडणुकीतही नक्की पराभव करू असेही सांगितले आहे. संग्राम गायकवाड यांनी दिलेला पाठिंबा वाया न घालवता, त्यांचा येतोचित सन्मान केला जाईल असेही आवर्जून सांगितले.
मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कल्याणराव काळे यांनी आमच्या विरोधात येऊन गल्लोगल्ली येऊन प्रचार केला .आम्ही प्रत्येकाची मूठ बांधण्याचा प्रयत्न करत होतो .परंतु कल्याणराव काळे यांनी प्रत्येक पक्षात दोन दोनदा जाण्याची भूमिका त्या ठिकाणी ठेवली. त्यांना आता जागा दाखवण्याची वेळ आली असल्याचे मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी सांगितले.
यावेळी प्रा.तुकाराम मस्के, तानाजी बागल, दीपक पवार, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वर्षाराणी शिंदे, समाधान गाजरे ,दत्ता नागणे, सुधाकर सुरवसे, बाळासो बागल, रणजीत बागल, पार्थ सुरवसे आदींनी भाषणे केली.
यावेळी पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक नागेश भोसले, पंचायत समितीचे माजी उपसभापती विष्णू भाऊ बागल, विठ्ठलचे माजी संचालक सूर्यकांत बागल, सुभाष गोडसे ,संग्राम गायकवाड, साहेबराव नागणे, हनुमंत बागल, चंद्रकांत पाटील, धनंजय काळे, विठ्ठलचे माजी संचालक बिभिषन पवार, विठ्ठल गाजरे यांचे सह विठ्ठल परिवारातील अनेक पदाधिकारी आणि वाखरी गटातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

