पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय माढा येथील प्रोफेसर व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दत्तात्रय मारुती काळेल यांनी लिहिलेल्या "ग्रामीण भारताचे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील'' या पुस्तकाचे प्रकाशन मकर संक्रातीच्या शुभ मुहूर्ता वरती व शंकराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व मा. खा. विजयसिंह दादा मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झाला.
यावेळी मोहिते पाटील यांनी डॉ. दत्तात्रय काळेल यांचे कौतुक करून धन्यवाद व्यक्त केले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी सर्वांजण कार्यक्रमास उपस्थित राहिले त्याबद्द्ल डॉ. दत्तात्रय काळेल यांनी आभार मानले.


