भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
आज दिनांक ३०/१२/२०२५ वार मंगळवार रोजी न्यायाधीश महेश ठोंबरे जिल्हा सत्र न्यायाधीश शिवाजीनगर,पुणे यांनी सहपरिवार आपल्या वसंतराव काळे विद्यामंदिर चंद्रभागानगर,भाळवणी प्रशालेस सदिच्छा भेट दिली.
यावेळी त्यांनी शालेय परिसर व शाळेतील शैक्षणिक उपक्रम याबद्दल समाधान व्यक्त केले.यावेळी न्यायाधीश ठोंबरे यांचा सत्कार संस्थेचे सचिव एच.आर.जमदाडे यांच्या शुभहस्ते शाल,फेटा व श्रीफळ देवून करण्यात आला.
याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक एस.एल.काळे सर प्रशालेतील सर्व सहशिक्षक,सहशिक्षिका उपस्थित होते.

