पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा व पंढरपूर तालुका तर्फे ग्राहक प्रबोधन पंधरवड्याचे उद्घाटन करण्यात आले आहे.
प्रथम कै. ह. भ. प. मनोहर ठाकरे महाराज व कै. सौ. अमृताताई अभंगराव यांना श्रद्धांजली वाहून सुरुवात केली. युवकांचे श्रद्धास्थान स्वामी विवेकानंद व ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी (नाना ) यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. राजेश ठाकरे( होमिओपॅथी) विनोद भरते (प्रांत सदस्य व जिल्हा पालक ) दीपक इरकर (प्रांत सह संघटक ) शशिकांत हरीदास (सोलापूर जिल्हा अध्यक्ष ) कार्यक्रमाचे अध्यक्ष मकरंद बडवे होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक संतोष उपाध्ये (जिल्हा सदस्य) यांनी केले. अखिल भारतीय ग्राहक पंचायत संघटनेबद्दल माहिती सांगितली. तालुका अध्यक्ष नंदकुमार देशपांडे यांनी पुढील पंधरा दिवस होणाऱ्या कार्यक्रमाबद्दल माहिती सांगितली. तसेच विविध शासकीय कार्यालयात होणाऱ्या लोकशाही दिन बद्दल माहिती सांगितली. ज्येष्ठ मार्गदर्शक नरेंद्र कवडे यांनी नानांच्या काळातील केलेल्या कामांची ओळख करून दिली. विनय उपाधे (सोलापूर जिल्हा सदस्य ) यांनी संघटना विविध प्रश्न कसे सोडवते. याची माहिती दिली.
यावेळी विनोद भरते यांनी संघटनेतील कार्यकर्ता कसा महत्त्वाचा आहे हे सांगितले. संघटनेची कार्यप्रणाली बद्दल माहिती दिली. तसेच दीपक इरकर यांनी संघटनेने आतापर्यंत केलेल्या कामाची ओळख आणि माहिती सांगितली.
प्रमुख पाहुणे डॉ. राजेश ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या शेवटी अध्यक्षीय भाषणात मकरंद बडवे यांनी त्यांच्यावर नानांच्या विचारांची कशी छाप आहॆ हे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश भोसले यांनी व आभार सागर शिंदे यांनी मानले.

