पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळोली शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणाऱ्या जळोली शाळेत आज शाळा व्यवस्थापन समिती, पदाधिकारी मेळावा.माजी विद्यार्थी मेळावा.माता पालक मेळावा.आयोजित करण्यात आला.त्यावेळी प्रथम जळोली गावच गुरुतल्य व्यक्तिमत्त्व मनोहर महाराज यांना श्रध्दांजली अर्पण केली.त्यानंतर जयवंत कापसे सर यांनी उपस्थित मान्यवरांच शब्दसुमनांनी स्वागत करत.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित जळोलीकर मान्यवर ग्रामस्थांच्या शुभहस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक जेष्ठ शिक्षक नागनाथ गायकवाड सरांनी हा मेळावा घ्यायच्या पाठीमागचा उद्देश उद्देश स्पष्ट करत शाळेचा सर्वांगीण विकासासाठी सर्व पालकांचा विद्यार्थ्यांनचा आणि शिक्षकांचा त्रिकोण साधला की शाळेची प्रगती होते.म्हणून शाळेच्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व पालकांनी अर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन करताच स्वतः जळोली शाळेच्या ८ शिक्षकांनी ४००००/- रोख जमा केले.आणि पालकांना आवाहन करताच सर्व पदाधिकारी आणि पालकांनी मिळून जवळपास १३००००/- रुपये जाहीर करत शाळेविषयी आपलेपणाची भावना दाखवली.
यावेळी ज्योतीराम मदने,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हनुमंत नरसाळे,तानाजी नरसाळे,, गणेश जाधव ,दत्तात्रय नरसाळे,अनिल जगताप , सोमनाथ पवार , ज्ञानेश्वर दुधाणे , बाळासाहेब खांडेकर , दत्तात्रय किर्ते,यांनी आपली मनोगते करताना शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी पैशाचा पूर येईल त्याची काळजी करु नका.सांगत आपली जळोली शाळा तालुका आणि जिल्हा स्तरावर चमकतेय.याचा आम्हांला अभिमान वाटतो आहे सांगितले.पुढील काळातही अशीच शिक्षणा बरोबर संस्कार शील पिढी बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिक्षकांनी सांगितले.यावेळी सर्व दानशूर दाते यांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला.
यावेळी आपल्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणखी डबल उर्जा निर्माण झाल्याची भावना शिक्षकांनी बोलून दाखवली.येत्या २६ जानेवारी पूर्वी सर्व भौतिक सुविधा पूर्ण करायच्या आहेत.यासाठी सर्व शिक्षक एकदिलाने कामाला लागले आहेत.यावेळी जळोली शाळेचे मुख्याध्यापक अनिल जगताप यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला.
यावेळी जळोली गावातील माता पालक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.विशेष म्हणजे शिक्षकांनी स्वयं स्फुर्तींने गणवेश केल्यामुळे शिक्षकांच्या एकीचं दर्शन घडले.कार्यक्रमाचे सुंदर सुत्रसंचलन जयवंत कापसे यांनी करत आभार देवकी कलढोणे -दुधाणे यांनी मानले.मेळावा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक अनिल जगताप सहकारी शिक्षक जयवंत कापसे नागनाथ गायकवाड सिध्देश्वर लोंढे कैलास नरसाळे बाळासाहेब खांडेकर देवकी कलढोणे -दुधाणे आणि ज्ञानेश्वर दुधाणे यांनी अधिक परिश्रम घेत मेळावा यशस्वी केला.

