पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
शिक्षण विभाग प्राथमिक व जिल्हा परिषद, सोलापूर व पंचायत समिती, पंढरपूर अंतर्गत 53 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सन 2025 - 2026 मध्ये श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ,पंढरपूर संचलित,श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता 5 वी ते 8 वी या लहान गटात चि.प्रेमराज अण्णासाहेब शेळके याच्या उपकरचा तृतीय क्रमांक आला असून त्याच्या ट्रान्समिशन लाईन या उपकरणाची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे.शेळके या विद्यार्थ्यास सौ.कांचन टकले, नितीन वायदंडे व प्रशालेतील सर्व गणित व विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.
त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.मदन क्षीरसागर, उपाध्यक्ष शिवाजी वाघ, सचिव ॲड. वैभव टोमके, सहसचिव अजित नडगिरे, खजिनदार सलीम वडगावकर, जेष्ठ संचालक आप्पासाहेब चोपडे, दिलीप आप्पा घाडगे, अनिरुद्ध भाऊ सालविठ्ठल, विजयकुमार माळवदकर, सौ.सुनीता मोरे यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक व प्रशालेचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल प्रशालेचे प्राचार्य अविनाश कटकधोंड, पर्यवेक्षक सुरेश कट्टे, वरिष्ठ लिपीक राजकुमार ढगे, शिक्षक प्रतिनिधी श्रीकांत चंदनशिवे,शिक्षकेतर प्रतिनिधी नागनाथ मैंदर्गी, तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून त्याचे अभिनंदन करण्यात आले व त्याच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.

