पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
नुकत्याच पुणे येथे पार पडलेल्या विभागीय स्पर्धेमध्ये 19 वर्षे वयोगटामध्ये कृष्णा शिंदे यांने रीकर्व गटामध्ये पुणे विभागातून प्रथम क्रमांक मिळवून 20 डिसेंबर रोजी अमरावती होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. अतिशय अटीतटीच्या आणि शर्यतीच्या स्पर्धेमध्ये कृष्णा शिंदे याने आपल्या कौशल्याच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले.
मागील वर्षी कृष्णा शिंदे याने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या ऑल इंडिया स्पर्धेमध्ये भारतात प्रथम क्रमांक मिळवला . त्याबद्दल त्याचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधून दरवर्षी क्रीडा क्षेत्रामध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे त्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये गुण प्राप्त होतात.
ग्रामीण भागामध्ये क्रीडा विभागामध्ये जास्तीत जास्त गुण घेणारी शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गादेगाव नेहमीच दिसून येते.
कृष्णा शिंदे यांच्या यशस्वी वाटचालीसाठी संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांनी शुभेच्छा दिल्या प्रशिक्षक सुर्वे त्याचबरोबर प्रकल्प संचालिका वर्षा मोरे ,प्राचार्य तनुजा यादव ,उपप्राचार्य नियाज मुलाणी, सहशिक्षक शितल मस्के, लीना बागल, शीतल बागल, फर्जना पटेल, सुनिता राठोड, अजय सावंत, वैभव माने, माहाकू खांडेकर, अविता कांबळे, तेजश्री गव्हाणे ,मोनाली गायकवाड, सोनाली मागाडे, अजय मोरे ,प्रवीण यादव, नवनाथ शिंदे, सायली सोनवले, यांनी कृष्णा शिंदे यास पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

