पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांचा माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्वांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सर्व पोलीस पाटलांना पोलीस उपअधीक्षक प्रशांत डगळे यांनी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी पोलीस उप अधीक्षक प्रशांत डगळे यांनी मनोगत व्यक्त करताना ग्रामीण भागात कायद्याचे रक्षण करण्यासाठी पोलीस पाटील बांधवांनी कोणत्या उपाययोजना, खबरदारी घेतली पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले,कायद्याचे पालन सर्व देशवासीयांनी केले पाहिजे.पोलिसांना जनतेमधूनच अनेक गोष्टींची माहिती होत असते, यातून बऱ्याच प्रमाणात गुन्हेगारी रोखण्यास मदत होते असे डगळे म्हणाले.
तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी आपल्या भाषणातून कायद्याचे पालन करीत असताना पोलीस पाटील यांची कशी मदत होते याबरोबरच गुन्हे रोखण्यासाठी त्यांनी अजून काय उपाययोजना केल्या पाहिजेत याची माहिती दिली.यावेळी तालुक्यातील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.


