भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
परमपूज्य सद्गुरु काशिनाथ महाराज रामदासी भाळवणी ता. पंढरपूर यांच्या ५२ व्या पुण्यतिथी निमित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .तरी भाविकांनी, ग्रामस्थांनी आवश्य लाभ घ्यावा. असे आवाहन सेवेकरी कल्याण कलढोणे यांनी केले आहे.
या कार्यक्रमाची रुपरेषा पुढील प्रमाणे आहे.
मंगळवारी दि.04 नोव्हेंबर ते रविवार दि.09 नोव्हे, 25 पर्यंत दररोज सकाळी 6 ते 8 नित्य पूजा व आरती करण्यात येणार आहे.
तसेच शनि. 08 नोव्हेंबर रात्री 09 वा ह.म.प. सौ. अनुष्का बर्वे यांची नारदीय किर्तन सेवा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी 8 नंतर सायं. 5 पर्यंत नामस्मरण रविवार दि.09 नोव्हें 25 रात्री 09. वा. ह.भ.प. कैलास खरे (पुणे) यांची किर्तन सेवा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सायं. 5 ते 6:30 समर्थ विरचित करुणाष्टके, सवाया व मनाचे श्लोक व नामस्मरण दररोज 5000 पर्यंत करण्यात येणार आहे.
कीर्तन कार्यक्रमास साथीदार म्हणून वैभव केंगार, ज्ञानेश्वर दुधाणे हे साथ देणार आहेत.
सोमवार दि. १० नोव्हेंबर सकाळी सूर्योदयाला सद्गुरू काशिनाथ महाराजांचे समाधीवर पुष्पवृष्टी होईल व गावातील प्रमुख मार्गावरून प्रतिमा मिरवणूक व त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने विशेष सहकार्य श्रीराम भजनी मंडळ भाळवणी ता. पंढरपूर भजन सेवा दररोज रात्री 9 वाजता करणार आहेत.


