म्हसवड प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र राज्यामध्ये संघटितपणे देवाभाऊ फाउंडेशन उत्कृष्टपणे कार्यरत आहे. देवाभाऊ फाउंडेशनच्या केंद्रीय कार्यालयातून पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा समन्वयक पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.यामध्ये देवाभाऊ फाउंडेशन माढा लोकसभा समन्वयक पदी आण्णासाहेब कोळी यांची सर्वानुमते निवड मुख्य समन्वयक श्री गजानन जोशी यांनी जाहीर केली आहे.
हिंगणी ता. माण जिल्हा सातारा येथील आण्णासाहेब कोळी हे अनेक वर्षापासून सामाजिक, राजकीय,पत्रकारिता,मंत्रालयीन, प्रशासकीय क्षेत्रामध्ये उत्कृष्टपणे कार्यरत आहेत.सद्या ते पत्रकार टाइम्सचे संपादक व महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. यासोबतच त्यांनी मंत्रालयामध्ये कॅबिनेट मंत्री यांचे स्वीय सहाय्यक म्हणून देखील काम पहिले आहे.यासोबतच विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय, मंत्रालयीन कामकाज पाहत आहेत.
सोबतच महायुतीचे घटक संघटना असलेल्या कोळी महासंघामध्ये राज्य कार्यकारिणी सदस्य अशा विविध पदांवर ते सध्या कार्यरत आहेत.आण्णासाहेब कोळी यांनी आपल्या स्वकर्तुत्वावर नवलौकिक करून राज्यभर संपर्क वाढवला आहे. संपूर्ण राज्यभर त्यांचा जनसंपर्क असल्याने याच कार्याची दखल घेत देवाभाऊ फाउंडेशनने त्यांची आज माढा लोकसभा समन्वयक पदी निवड केली आहे.
या निवडीबद्दल त्यांचे राजकीय, सामाजिक, उद्योग, प्रशासकीय, पत्रकारिता, मंत्रालय आदी विविध क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.
देवाभाऊ फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यातील व माढा लोकसभेमधील सर्व सामान्य जनतेची सेवा करणार - आण्णासाहेब कोळी

