बदलापूर प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर तेज न्यूज
जनजागृती सेवा संस्था गेली चार वर्षे विविध क्षेत्रात समाजउपयोगी, लोकाभिमुख उपक्रम राबवित आहे.संस्थेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग असतोच.त्याच प्रमाणे संस्था यशोशिखरावर जात असताना समाजातील अन्य आदरणीय, सन्मानिय व्यक्ती संस्थेसाठी सल्ला, आर्थिक सहभाग, सहकार्य, मार्गदर्शन करत असतात.
त्याच अनुषंगाने काही प्रतिभावंत व्यक्तींचे सल्ला, मार्गदर्शन मिळावे याकरिता जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने सन्मानिय डॉ.महेश अभ्यंकर(सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकिय विषयांवरील पुस्तके प्रकाशित, लेखक, पुस्तक पेढी भेट योजनेचे संस्थापक, लेखक, समुपदेशक), दिलीप नारकर(माजी कमांडींग ऑफीसर'ई'परिमंडळ बृहन्मुंबई, अध्यक्ष-समता साहित्य अकादमी महाराष्ट्र, राष्ट्रपती पदक सन्मानित, संस्थापक सदस्य-सिटीझन वेल्फेअर असोसिएशन),रामजित(जितु) गुप्ता(मुंबई ॲन्टी पायरसी सेलचे मुख्य तपासी अधिकारी, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात विविध पुरस्कारांनी सन्मानित, महाराष्ट्रातील विविध संस्थांशी घनिष्ठ संबंध, परोपकारी व्यक्तीमत्व), अरविंद सुर्वे (संचालक -उषा हाॅस्पिटलिटी डोंबिवली, डोंबिवलीतील सामाजिक संस्थांनवर कार्यरत, ग्रामीण विभागातही उत्कृष्ट कार्य, जेष्ठ समाजसेवक) यांची"सल्लागार पदी"नियुक्ती करण्यात आली आहे.
कार्यकारिणीच्या ऑनलाईन मिटींगमध्ये सर्व सहमतीने त्यांना नियुक्ती पत्र पाठविण्यात आली.सल्लागारपदी निवड झाल्याबद्दल डॉ.महेश अभ्यंकर,रामजित(जितु) गुप्ता, दिलीप नारकर, अरविंद सुर्वे यांनी समाधान व आनंद व्यक्त केला.संस्थेच्यावतीने अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी अभिनंदन केले.