नवी दिल्ली प्रतिनिधी तेज न्यूज
आज जगभर तंत्रज्ञानाबद्दल चर्चा आणि विकास होत आहे. आज मी इथे कोणावरही टीका करण्यासाठी आलो नाहीये. पण चार-पाच दशकांपूर्वी आपल्या देशात सेमी कंडक्टरबद्दल चर्चा होत होती, पण कोणीही लक्ष दिले नाही आणि ती कल्पना रद्द करण्यात आली.
पण आम्ही हा अपराध दूर करण्यासाठी काम केले आहे आणि जमिनीवर 6 युनिट्स उभारत आहोत आणि वर्षाच्या अखेरीस आम्ही मेड इन इंडिया चिप्स आणू, अशी माहिती नरेंद्र मोदींनी यांनी दिली.