पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील मंडल भाळवणी व भंडीशेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भंडीशेगाव येथे पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे व तहसीलदार सचिन लंगुटे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय पंढरपूर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान अंतर्गत दिनांक 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सुमन पाटील या होत्या.
यावेळी उपसरपंच मंगेश ननवरे भाळवणी गावचे सरपंच रणजीत जाधव,धनाजी कवडे, पांडुरंग कारखान्याचे संचालक गंगाधर विभुते, सर्कल दिनेश भंडगे,सर्कल गणेश साठे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना व पालकांना रहिवासी दाखला उत्पन्नाचा दाखला नॉन क्रिमीलेयर रेशन कार्ड व इतर दाखल्याचे वाटप करण्यात आले. यावेळी केंद्राचे सुधाकर पवार, गणेश जमदाडे ,आर के पवार व ग्रामस्थ उपस्थित होते