पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आज दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता पंढरपूर येथील रखुमाई सभागृह पोलीस संकुल शहर पोलीस स्टेशनच्या समोर येथे पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने आगामी येणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त व ईद-ए-मिलाद निमित्त पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गणेश मंडळाचे पदाधिकारी व ईद-ए-मिलाद चे पदाधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन केले होते.
पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या नूतन प्रभारी रेखा घनवट यांनी गणेश उत्सव मंडळाकडून व पदाधिकाऱ्याकडून गणेश मंडळाविषयी माहिती जाणून घेतली तसेच त्यांनी गणेश उत्सव कालावधीमध्ये सामाजिक उपक्रम जसे चित्रकला वक्तृत्व स्पर्धा असे उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करावा असे आव्हान केले.तसेच ईद-ए-मिलाद साजरा करतानाही सामाजिक उपक्रम राबवावीत असे आव्हान घनवट यांनी केले .
या बैठकीसाठी पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेळवे गावचे पोलीस पाटील एडवोकेट नवनाथ पाटील धोंडेवाडी गावचे पोलीस पाटील नितीन देठे पाटील पिराची कुरोली वाडी कुरोली गार्डी पळशी सुपली तिसंगी सोनके कोर्टी हुपरी कौठळी लोणारवाडी गार्डी बोहाळी उंबरगाव गावचे पोलीस पाटील उपस्थित होते.
तसेच ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अनेक गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये ग्रामीण पोलीस स्टेशनच्या प्रभारी रेखा घनवट यांनी मार्गदर्शन केले पोलीस पाटील यांनीही आपली मते मांडली व पदाधिकाऱ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.