पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
महसूल सप्ताह निमित्त दिनांक 3 ऑगस्ट रोजी पंढरपूर तालुक्यात तहसीलदार सचिन लंगुटे , गटविकास अधिकारी सुशील संसारे यांच्या हस्ते पाणंद रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली.
यावेळी लोणारवाडीचे मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, माजी सरपंच व ग्रामस्थ, ग्रामरोजगार सेवक, नरेगा तांत्रिक अधिकारी, अव्वल कारकून ग्रामस्थ उपस्थित होते.
वृक्ष रोपण केल्यानंतर त्या रोपांचे संगोपन करण्याच्या सूचना तहसीलदार लंगुटे व गटविकास अधिकारी संसारे यांनी दिल्या. तसेच करकंब, भोसे, जळोली, रांजणी येथे सरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक व ग्रामस्थ यांच्या हस्ते महसूल सप्ताह निमित्त तहसीलदार यांच्या सूचनेनुसार पांनंद रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली.