वाळवा प्रतिनिधी तेज न्यूज शिगाव ता.वाळवा येथील सिद्धार्थ संदीप कांबळे याने क्रीडाक्षेत्रातील स्केटिंग या खेळामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषद,भारत यांच्या मार्फत 2025 या वर्षीचा मेजर ध्यानचंद सुवर्णलक्ष नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्डने सिद्धार्थ ला सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रम सोहळा राजारामबापू पाटील नाट्यग्रह, इस्लामपूर येथे पार पडला. या कार्यक्रमात मा. आ. भगवानराव साळुंखे(माजी विधान परिषद सदस्य), मा. पै. आप्पासाहेब कदम (महाराष्ट्र केसरी), मा. गणेश कोडते(आर. एस. पी. ऑफिसर, सांगली)यांच्या हस्ते अवॉर्डचे प्रमाणपत्र, मेडल,व्ही.आय.पी. कार्ड देऊन गौरवण्यात आले.
कासेगाव येथील राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी येथील ग्रंथपाल एस. जी कांबळे यांचे ते चिरंजीव असून सिद्धार्थ सध्या होली मदर इग्लिश मिडीयम स्कूल येथील विद्यार्थी असून सध्या इयत्ता 10 मध्ये शिक्षण घेत आहे. पेठ वडगाव मधील आशुतोष रोलर स्केटिंग अकॅडेमी चे प्रशिक्षक आशुतोष फुटाणे यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. त्याच्या या उत्तुंग यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.