मुंबई मेट्रो रेल्वेच्या प्रवाशांच्या सुरक्षेचे काय ?
कधी नव्हे ते इतक्या वर्षात मोनोरेल ला चांगला दिवस आला आणि एरव्ही रिकामी धावणारी तसेच तोट्यात चालणारी ही ट्रेन १९ ऑगस्ट रोजी खच्चून भरली होती.तिकीट काउंटरवर तिकीट देत नसतानाही अनेकजण तिकिटासाठी आग्रही होते.१०५ टन वजन वाहून नेण्याची प्रवासी क्षमता असलेली ही गाडी जोरदार पावसात लवकर घरी पोहचावे या उद्देशाने १०९ टन वजनाने भरली आणि बंद पडली.थोडीशी कलंडली.ती जर खाली पडली असती तर..प्रवासी अडकून पडले. ए सी बंद असल्याने ज्येष्ठ नागरिक लहान मुल कासावीस झाली.गाडी का बंद पडली याचे उत्तर अधिकारी वजनाने बंद झाली एवढेच सांगत होते.मोनोरेल व्यवस्थित सुरू राहण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले पण पावसाळ्यात प्रवाशांच्या सुरक्षेचं काय असा प्रश्न आहे.कोणत्याही वेळी काहीही होऊ शकते पण प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यायला हवेच.प्रवाशांनी देखील घाई न करता दुसऱ्या गाडीची वाट पाहायला हवी होती.गाडी बंद पडल्याने इतर मोनोरेल देखील खोळंबल्या. अती घाई...संकटात नेई याचा प्रत्यय त्यामुळे सर्वांनाच आला.पण लक्षात कोण घेतो.
गणेश हिरवे
जोगेश्वरी पूर्व