पंढरपुर प्रतिनिधी तेज न्यूज
दिनांक १८/०८/२०२५ रोजी पहाटे गोपनिया बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पंढरपुर शहरामध्ये सुगंधी तंबाखु अवैध रित्या विक्रीकरणार आहे सध्या सदरचा सुगंधीत तंबाखु ही पंढरपुर शहरातील वसीम निसार तांबोळी, रा. अकबर अली रोड, पंढरपुर यांचे घरी आहे अशी मिळालेल्या बातमीच्या आधारावर वसीम तांबोळी यांचे राहते घरी जाऊन तपासणी केली असता सदर ठिकाणी सुगंधित तंबाखु असलेली तीन पांढऱ्या रंगाची पोती मिळून मिळून आली.
सदर पोत्यामध्ये ५०० ग्रॅम वजनाचे सिलबंद सुगंधित तंबाखुचे पुडे असल्याचे निदर्शनास आले. सदर पाकिटे फोडून पाहिला असता त्यास सुगंधित तंबाखुचा वास येत असल्याचे आढळून आल्याने त्यांचेवर पंढरपुर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ५१०/२०२५ अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ चे कलम २६ (२) (i) (ii) (iv), २७ (३) (e),३० (२) (a), ५९ भारतीय न्याय संहिता कलम २२३, २७४, २७५, १२३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे .
सदर ठिकाणी कारवाईमध्ये मिळून आलेल्या मालाचे वर्णन खालील प्रमाणे २,२३,०००/- रू किंमतीची तिन पांढऱ्या रंगाची पोती त्यामध्ये प्रत्येकी ५०० ग्रॅम वजनाची २२३ पाकीटे प्रत्येकी १०००/- रू किंमतीची असे एकुण २,२३,०००/- असे आहे.
सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, सहा. पोलीस अधिक्षक, प्रशांत डगळे, पंढरपुर उपविभाग पंढरपुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्वजीत घोडके पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ निलेश रोंगे, पोना विनोद शिंदे, पोकॉ राहुल लोंढे, शिवशंकर हुलजंती, मसपोफौ राजश्री कटके मपोकों/शोभा कदम यांनी केली आहे.