पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
जैनवाडी ता .पंढरपूर येथे शाश्वत दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली यानंतर विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांना शाश्वत शेती म्हणजे काय तेच उद्देश फायदे आणि पर्यावरणासाठी तिचे महत्त्व याविषयी माहिती दिली विद्यार्थ्यांनी गावातील शेतकऱ्यांसमवेत संवाद साधत सेंद्रिय शेती आंतरपीक मिश्र पीक प्रणाली पाण्याची व्यवस्थापन जैविक खते वापरणे अशा विविध विषयावर माहिती दिली.
या माहिती द्वारे शेतकऱ्यांमध्ये रासायनिक शेती तोटे आणि नैसर्गिक शेतीचे फायदे यावर प्रकाश टाकण्यात आला कार्यक्रमाचे समारोप शाश्वत शेती शाश्वत भविष्य या संदेश करण्यात आले यावेळी गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक करत अधिक पर्यावरणावर पूरक शेती पद्धतीचे अवलंबन करण्याचा संकल्प केला त्यावेळी समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
कृषी दूत यशराज दळवे ,अमित जगदाळे ,प्रथमेश करे ,प्रशिक साबळे, सुयश साखरे ,संकल्प शिराळकर , सोनू वाडे,ऋषिकेश गिराम ,आणि ज्योतीराम ढवळे यांनी सहभाग नोंदवला या कार्यक्रमासाठी रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर .जी.नलावडे तसेच एस एम एकतपुरे(कार्यक्रम समन्वयक) प्रा. एम .एम चंदनकर (कार्यक्रम अधिकारी) आणि यांचे मार्गदर्शन लाभले