ईगतपुरी तालुका प्रतिनिधी नवनाथ गायकर तेज न्यूज
नाशिक जिल्हयातील सुप्रसिध्द विनोदी व ग्रामीण कथा लेखक , तेज न्यूज चॅनल ईगतपुरी तालुका प्रतिनिधी यांचे संपुर्ण महाराष्ट्र भर सातत्याने कथा - कथनाचे कार्यक्रम होत असतात. येत्या मंगळवार दि.१९ ऑगस्ट रोजी पुणे येथे साहित्य संमेलनात त्यांचे कथा कथन होणार आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे अंतर्गत आयोजीत ४ थे राजकुमार काळभोर एक दिवसीय साहित्य संमेलनात गायकर यांचे कथा कथन आयोजीत करणेत आले आहे.
या संमेलनाचे संयोजक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे हे असुन त्यांचे नेतृत्वाखाली पदाधिकारी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहे.