पुळुज प्रतिनिधी दत्तात्रय पांढरे तेज न्यूज
आतापर्यंतच्या इतिहासात पुढारी येतात आश्वासन देतात. आणि निघून जातात पण आश्वासनाची पूर्तता करत नाहीत. सागर दोलतडे आपला दिलेला शब्द पाळला आहे.
वचन पूर्ती:
31 मे 2025 रोजी पंढरपूर तालुक्यातील पुळुज गावामध्ये समृद्धी बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय पांढरे यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून विशेष समाजकल्याण राष्ट्रीय अध्यक्ष सागर (भैय्या) दोलतडे आमंत्रित केले होते. कार्यक्रमात बोलत असताना तेथील पाच गरीब आणि होतकरू मुलींना इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षणासाठी दत्तक घेण्याचे वचन दिले होते. ते वचन त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी
१) वैशाली झुबरे २) तेजस्विनी कुंभार ३)कल्याणी तरटे ४) ईश्वरी रणसिंग ५) स्वप्नाली आठवले ह्या मुली लिंगेश्वर विद्यालय पुळुज या शाळेत शिकत आहेत.
इयत्ता पाचवीच्या ५ मुलींचा संपूर्ण वर्षाचा खर्च युनिफॉर्म, शाळेची फी दप्तर, वह्या पुस्तके हे सर्व साहित्य लोकनियुक्त सरपंच विश्वास (भैया )महाडिक, यांच्या हस्ते त्यांना देऊन पूर्ण केले.स्वतःचा प्रपंच आणि कुटुंब सांभाळताना कित्येक अडचणी येतात. पण या पाच मुली धरून टोटल २८ मुली, सागर (भैय्या) दोलतडे यांनी दत्तक घेतलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ह्या पाच मुलीची देखरेख समृद्धी बहुउद्देशीय संस्था करेल.
यावेळी उपसरपंच सदाशिव म्हमाने, जलसंपदा विभागाच्या अधिकारी सौ. रोहिणी लोमटे, रतिलाल गावडे, किसन जाधव, लक्ष्मण लोमटे,सर राजाराम बाबर, लक्ष्मण पांढरे, अश्रुभान येळे, मोहन गावडे, मंडळ अधिकारी सुरवसे भाऊसाहेब तलाठी तनमोर, भाऊसाहेब केंद्रप्रमुख भोई सर मुख्याध्यापक गायकवाड सर, टाकळे सर, माडे सर, पवार सर, राठोड सर, लिंगेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक स्टॉप सर्व ग्रामस्थ मोठ्या बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सर्व नियोजन समृद्धी बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय पांढरे यांनी केले होते.
५ वी ते १२ वी चा शिक्षणासाठी चा पूर्ण भार उचलण्याचे पुण्य स्वामी समर्थांनी माझ्या पदरात टाकलं. हे काम करत असताना मला खूप मोठं समाधान मिळत आहे.
सागर भैय्या दोलतडे
विशेष समाज कल्याण परिषद राष्ट्रीय अध्यक्ष