सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स इंन्टरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब ऑफ सोलापूर व्टिन सिटीचा पदग्रहण सोहळा थाटात संपन्न झाला.
सुरुवातीस लायन रविकिरण वायचळ यांनी घंटानाद केले. व्यासपीठावर प्रांताचे उपप्रातपाल एम जे एफ लायन राजेंद्र शहा कासवा, माजी प्रांतपाल एम जे एफ लायन डॉ नारायणदास चंडक, एम जे एफ लायन डॉ व्यंकटेश यजुर्वेदी एम जे एफ लायन अशोक मेहता, एम जे एफ लायन अरविंद कोणशिरसगी,माजी अध्यक्ष लायन रविकिरण वायचळ,माजी सचिव सध्याचे झोन चेअरमन लायन सोमशेखर जगदेवी ईरप्पा भोगडे, खजिनदार लायन प्रभाकर जवळकर, याची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ध्वजवंदन माजी अध्यक्ष कॅबिनेट ऑफीसर लायन मुकुंद जाधव यांनी केले. सर्व मान्यवरांचे माजी अध्यक्ष लायन रविकिरण वायचळ यांनी स्वागत करुन सत्कार केले. सचिवांचा अहवाल लायन सोमशेखर भोगडे यांनी सादर केले. पदग्रहण अधिकारी उपप्रातपाल एम जे एफ लायन राजेंद्र भाई शहा कासवा यांनी नुतन अध्यक्ष लायन सौ डॉ कृष्णा राहुल चंडक, सचिवा लायन सौ नंदिनी जाधव, सहसचिव इंजि.लायन सागर पुकाळे खजिनदार लायन प्रभाकर जवळकर, सहखजिदार एम जे एफ लायन ममता बुगडे, प्रथम उप्पाध्यक्ष लायन राजेश परसगौड, टेमर लायन संतोष जोशी, टेल व्टिसटर लायन देवा गायकवाड, संचालक मंडळ एम जे एफ लायन डॉ राहुल चंडक, लायन मुकुंद जाधव, जी एल टी चेअरमन लायन सोमशेखर भोगडे, जी एस टी चेअरमन लायन रविकिरण वायचळ, एल सी एफ चेअरमन एम जे एफ लायन डॉ राहुल चंडक, आयटी चेअरमन लायन सो मोनिका रविकिरण वायचळ, मेंबरशिप चेअरमन,जन संपर्क अधिकारी लायन नागेश बुगडे या सर्वांना गोपनीयतेची शपथ देण्यात आले. पुढील कार्यास शुभेच्छा देऊन क्लबचे कौतुक केले. डिस्ट्रिक्ट प्रांतपाल एम जे एफ लायन डॉ विरेंद्र चिखले,रिजन चेअरमन एम जे एफ लायन अॅड श्रीनिवास कटकुर, माजी प्रांतपाल गण यांनी शुभसंदेश वाचण्यात आले.
डिस्ट्रिक्टचे रिजन १, झोन ५ झोन चेअरमन लायन सोमशेखर भोगडे यांनी आपल्या मनोगतात अध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि संचालक मंडळास पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिले.तसेच यावेळी डॉक्टर डे दिवस सेवाकार्य डॉ रोहिणी देशपांडे. डॉ सुजाता कुलकर्णी, डॉ विद्या तिरणकर. डॉ सुलभा झांबरे, सीए दिवस किसन जोशी,शेतकरी दिन गणपती राठोड नुतन या सर्वांना समान चिन्ह,शाल, बुके मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आला.नुतन अध्यक्ष लायन डॉ सौ कृष्णा राहुल चंडक यांनी मान्यवरांना भेट वस्तू प्रदान करून आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यावेळी सोलापूर लायन परिवारातील इतर क्लबचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार, कॅबिनेट ऑफीसर यांची उपस्थिती होती. शेवटी आभार प्रदर्शन सचिवा लायन सौ नंदिनी जाधव यांनी केले.सुत्रसंचलन लायन नंदिनी जाधव, इंजि. लायन सागर पुकाळे यांनी केले.