हरियाणा प्रतिनिधी तेज न्यूज
कुरुक्षेत्र येथे नामदेव समाज या संस्थेचे पदाधिकारी अशोककुमार, विनोद कुमार , बलजीत सिंग खुरपा पंकजकुमार यांना पंढरपूर येथे होणाऱ्या श्री संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्याची निमंत्रण देण्यात आले. या कार्यक्रमास जास्तीत जास्त समाज बांधव उपस्थित राहणार असल्याचे बलजीतशिंग खुरपा यांनी सांगितले.
यावेळी बलजीतसिंग सिंग खुरपा यांचे फार कौतुक करण्यासारखं गोष्ट असून वयाचे ७८ वर्षांचे असताना सुद्धा आम्हाला ते काल रात्री ११:वाजता समाज मंदिरापासून १५- किलो मीटर दूर असलेल्या पिपंली गावाला घ्यायला आले.
यावेळी मनोज भांडारकर म्हणाले की त्यांची सामाजिक बांधिलकी व समाजाबद्दल प्रेम हे नक्कीच वाखण्या जोगे आहे खरोखर बलजीत सिंग यांच्याकडून आपल्या महाराष्ट्रातील समाज बांधवांनी सुद्धा यांचा आदर्श घेण्यासारखे आहे कारण की अतिथी देवो भव हे ब्रीदवाक्य खरोखर त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते.