पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर भाजी मंडई मधून पसरणारी अस्वच्छता थांबवणे महत्वाचे आहे. दुर्गंधीयुक्त मुतारी व कचरा यावर बसलेल्या माशा परिसरात विक्री व्यवहार होणारे फळेभाजीपाला व दूधदही यांवर सुद्धा बसतात. त्यामुळे येथून अस्वच्छता पसरत आहे. लाखो भाविक येथून फळे, भाज्या, दूध आणि दही असे जीवनावश्यक अन्नपदार्थ विकत घेऊन नैवेद्य दाखवून प्रसाद रूपात खातात. येथे आरोग्य व श्रद्धा असे दोन्ही बाधीत होत आहे.
भाजी मंडईच्या पूर्व रस्त्यावर होणारी ग्राहक,भाविकांची गर्दी कमी करण्यासाठी भाजी मंडईत असलेल्या तीन मार्गाचा उपयोग करून भाजी मंडईच्या पश्र्चिम दिशेला असलेल्या प्रदक्षिणा मार्गाकडे जाण्यासाठी सोय करता येईल व भाजी मंडई सुद्धा सुरू ठेवता येईल. त्यासाठी भाजी मंडईच्या पूर्व दिशेला असलेल्या कुंपण भींती व पश्र्चिम दिशेला असलेल्या कुंपण भींती पाडून भाजी मंडईतील तीन मार्ग सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी खुल्या कराव्यात.
पंढरपूर भाजीमंडईच्या ईशान्य दिशेला व अनंत रामचंद्र बडवे राहात असलेल्या घरा शेजारी दुर्गंधी युक्त मुतारीची तत्काळ दुरुस्ती करावी किंवा ती मुतारी व मंडईचे कुंपणपाडून प्रदक्षिणा मार्गाकडे जाण्यासाठी तीन (3) छोट्या मार्ग तयार करून भाजी मंडईतून रस्ता करावा अशी मागणी परीसरातील नागरिकांनी केली आहे.