भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील तिसंगी येथील सुपुत्र व पांडुरंग साखर कारखान्याचे संचालक तानाजी वाघमोडे देशमुख यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती झाल्याबद्दल वाघमोडे यांचा डॉ.नवनाथ खांडेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, हार,फेटा घालून सत्कार करण्यात आला.यावेळी प्रशांत माळवदे, रुषीकेश देशमुख,वासूदेव लिंगे, विश्वजीत देशमुख, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी तानाजी वाघमोडे म्हणाले की आमचे नेते प्रशांत राव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत आहे.गाव पातळीवरील कार्यकर्त्यांची कामे करत आहे.त्यांच्या आशिर्वादामुळेच मी काम करत आहे.यापुढे ही प्रशांत मालकांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे.असे ही वाघमोडे म्हणाले.