वाडी कुरोली प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्था धोंडेवाडी येथे २६ जुलै कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब काळे गुरुजी होते. यावेळी माजी सैनिक भैरव इंगवले यांचा सन्मान करण्यात आला. तसेच प्राध्यापक रामलिंग हागवणे यांचे व्याख्यान घेण्यात आली.
या व्याख्यानामध्ये प्राध्यापक रामलिंग हागवणे म्हणाले की हिंदुस्तानातील महापुरुषांच्या गौरव गाथा मोठी आहे .भारत देश बलशाही होण्यासाठी युवकांनी हातभार लावला पाहिजे असे सांगितले.तरुणांनी देश सेवेसाठी तत्पर राहिले पाहिजे आयटीआय च्या माध्यमातून देखील सैन्य भरती होवून देश सेवा करता येते असे सांगितले. माजी सैनिक भैरू इंगवले गेले यांनी देखील आपला सैनिकी अनुभव विद्यार्थ्यांना सांगितला. कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब काळे गुरुजी यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आय टीआय प्राचार्य संतोष गुळवे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल ननवरे यांनी केले.आभार प्रदर्शन अमोल आयरे यांनी मानले .सदर कार्यक्रमास संस्थेचे सचिव चंद्रकांत कुंभार,आयटीआय सर्व निदेशक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.