जळगांव प्रतिनिधी तेज न्यूज
पुणे येथे शिक्षणासाठी गेलेला शिंपी समाजा चा युवकाची झालेली निर्गुण हत्याकांडा संदर्भात गुन्हेगारांना कडक शासन होणे बाबत आज रोजी जळगाव शहरातील शिंपी समाजाचे विविध संघटनामार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी साहेब यांना निवेदन देण्यात आले.
स्व. निखिल अशोक सावळे राहणार ठेंगोडा तालुका बागलाण हा युवक चारच महिन्यापूर्वी उच्च शिक्षणासाठी भारतीय विद्यापीठ पुणे येथे गेला असताना भर चौकामध्ये कोयता गॅंग चे लोकांनी त्यास सिगारेट साठी पैशाची मागणी केली असता, त्यास नकार दिल्याने त्यांनी धारदार शस्त्राने डोक्यात वार करून अमानुषपणे निरपराध तरुणाची भर चौकात हत्या केली. कायदा सुव्यवस्थाची स्थिती पुणे सारख्या शिक्षणाचे माहेरघर असलेल्या ठिकाणी पूर्णपणे कोलमडून गेलेली आहे.
निरपराध तरुणाच्या निर्गुण हत्या संदर्भात आज जळगाव शहर शिंपी समाजातर्फे तीव्रपणे निषेध व्यक्त करून जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी शिवाजीराव शिंपी राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिल भारतीय मध्यवर्ती संस्था, चंद्रकांतदादा जगताप अध्यक्ष एकता शिंपी समाज संस्था, किशोरभाऊ निकुंभ अध्यक्ष नाम संस्कृती शिंपी समाज संस्था महाबळ परिसर, संदीप प्रकाश जगताप अध्यक्ष नामविश्व शिंपी समाज फाउंडेशन, संजय मधुकर चव्हाण जिल्हा प्रमुख सांस्कृतिक आघाडी जळगाव, मनोज नेरपगार नाम संस्कृती फाउंडेशन जळगाव, तसेच सौ.सविता राजेंद्र बोरसे समाजसेविका जळगाव जिल्हा प्रसिद्धीप्रमुख नानासाहेब कापडणे हे याप्रसंगी उपस्थित होते.