कमलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
कमलापूर गावच्या नूतन सरपंचपदी सौ.रूपाली सतीश तंडे यांची बिनविरोध निवड झाली.कमलापूर गावच्या 2019 ते 2025 या पंचवार्षिक कालावधीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडलेली होती.
सुरुवातीला सौ.कलावती बंडगर त्यानंतर मधुकर तंडे,त्यानंतर कमलापूर गावचे युवा नेते रावसाहेब अनुसे वरील सर्वांनी सरपंच पदाची धुरा अत्यंत यशस्वीपणे पार पाडली. कमलापूर गावचे युवा नेते बाबुराव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली कमलापूर ग्रामपंचायतचा कारभार अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला. कमलापूर गावातील पायाभूत सुविधेवर विशेष भर दिला.लोकांना सर्वाधिक घरकुले मिळवून देण्याचा प्रयत्न झाला. पंचक्रोशीतील लोकांच्या अडीअडचणी सातत्याने ग्रामपंचायत कमलापूर यांनी प्रामाणिक प्रयत्न केले.
युवा नेते रावसाहेब अनुसे यांनी आपला कालावधी पूर्ण केल्यानंतर रीतसर मुदतीपूर्व राजीनामा दिला.व मनाचा मोठेपणा दाखवला. त्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर 30 जून रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये रूपाली सतीश तंडे यांचा एकमेव अर्ज आल्याने सदरची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली. सदर सरपंच पदाच्या निवडीच्या वेळी कमलापूर गावातील आजी माजी सरपंच, उपसरपंच, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, विकास सेवा सोसायटीचे आजी-माजी चेअरमन,व्हाईस चेअरमन, माझी माझी सोसायटीचे संचालक,शेतकरी कामगार पक्षाचे बहाद्दर कार्यकर्ते, तंटामुक्तीचे अध्यक्ष उपाध्यक्ष, कमलापूर गावातील समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर निवडणुकीच्या कामकाजासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. जाधव साहेब, कमलापूर गावचे तलाठी पंडित भाऊसाहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची मुक्त उधळण करून आनंद उत्सव साजरा केला.