करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती केंद्र पांढरेवाडी येथे नुकतीच सुरू होत असलेल्या शाळांमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींच फेटा गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते स्वागत करण्यात आले.
त्यानंतर शासनाच्या विविध योजना अंतर्गत पुस्तके,शूज, आणि गणवेशाचे वाटप करण्यात आले त्यानंतर शाळेतील सहशिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना वही पेनपट्टी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.तसेच या शाळेचा विद्यार्थी यश नितीन वसेकर याने सैनिक स्कूल मध्ये निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्ञानेश्वर दुधाणे यांनी नवीन शैक्षणिक वर्षातील विविध शाळेच्या गुणवत्ता पूर्ण शिक्षणाबरोबर भौतिक सुविधा याविषयी माहिती देत सर्व पालकांनी असंच सहकार्य करण्याचे आवाहन केले.तसेच गुणवत्ता पूर्ण शिक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे सांगितले.
यावेळी बिभीषण वसेकर,नितीन वसेकर यांनी मनोगत व्यक्त केले.शाळेच्या वतीने गोड दिवसाची गोड सुरुवात जिलेबी वाटपाने केली.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास माळी उपाध्यक्ष प्रवीण कवडे, ज्ञानेश्वर वसेकर, बिभीषण वसेकर, राजाभाऊ वाफळकर, नितीन वसेकर,प्रमोद टेके,शंकर कवडे, तुकाराम चौधरी,विद्या वसेकर, दिपाली वसेकर,सारिका घनवट आदी पालक पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक किरण ढोबळे मोठ्या संख्येने उपस्थित होते.