माढा प्रतिनिधी तेज न्यूज
संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील अरण गावातील तीर्थक्षेत्रास “अ” दर्जा बहाल केला आहे. अशी माहिती ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तेज न्यूजला दिली.
या ठिकाणी समाधी मंदिर व परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भूमी अधिग्रहण, संरक्षक भिंत, मंदिर दुरुस्ती आणि अन्य विविध विकासकामांची आखणी करण्यात आली आहे.
या कामांसाठी शिखर समितीची मान्यता मिळाल्याचे जाहीर करत संबंधित प्रस्ताव तातडीने पाठवून आराखड्यास अंतिम रूप देण्याचे निर्देश गोरे यांनी दिले.
या महत्त्वपूर्ण बैठकीस प्रधान सचिव एकनाथ डवले, मंदिर संस्थानचे प्रमुख ह.भ.प.सावता महाराज वसेकर आणि ह.भ. प. प्रभू महाराज माळी , आबासाहेब खारे,अमर हजारे,दशरथ बनकर प्रत्यक्ष उपस्थित होते. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, कार्यकारी अभियंता अजय भोसले तसेच वास्तुविशारद हेमंत पाटील यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला.