पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील अनेक गावातील मागासवर्गीय लोकांना शासनाचे घरकुल मंजूर झाली आहेत. व अनेक लाभार्थ्यांना घरकुल चा पहिला हप्ता मिळाला असून. त्यांना घराचे काम चालु करण्यासाठी वाळु उपलब्ध नाही.
तरी शासनाने घरकुल साठी पाच ब्रास वाळु देण्याचे ठरवल्याने त्यांना प्रशासनाने वाळु लवकर उपलब्ध करून द्यावी. या मागणीचे निवेदन पंढरपूर तहसिलदार सचिन लंगुटे यांना देण्यात आले.
यावेळेस तालुकाध्यक्ष. जयसिंग मस्के, संपर्क प्रमुख. मुकुंद घाडगे, माजी सभापती. श्रीमंत मस्के, पुरोगामी संघर्ष परिषदेचे अध्यक्ष. उमेश वाघमारे, व शाहीर नंदकुमार, पाटोळे उपस्थित होते.