शेळवे प्रतिनिधी तेज न्यूज
21 जून हा दिवस अंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून सर्वत्रच उत्साहात साजरा केला जातो,शेळवे ता.पंढरपूर येथील सनराईज पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये सुद्धा योग दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला..
सकाळच्या सत्रात प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रांगणात शिस्तबद्ध उभा करून सैनिकी प्रशिक्षण कोर्स संचालक लेफ्टनन नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली इन्स्ट्रक्टर सुरज सर आणि नंदिनी मॅडम यांच्या सहकार्याने विविध योगासनांचे प्रकार आणि प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले,प्रशालेचे सहकारी शिक्षक मोहन गायकवाड यांनी ही विद्यार्थ्यांना वेगवेगळे योग प्रकार शिकवले, प्राणायाम,सूर्यनमस्कार, मेडिटेशन,कपालभाती, शवासन,शिर्षासन असे नानाविध योगासन प्रकार विद्यार्थ्यांनी सहजरीत्या केले..
सरतेशेवटी प्रशालेचे संगीत शिक्षक योगेश गायकवाड यांनी संगीत विशारद परीक्षेसाठी बसलेल्या सर्व प्रशिक्षनार्थी विद्यार्थ्यांना घेऊन राग भैरवी,यमन,मेघमल्हार इत्यादी राग गायन करून वातावरण आल्हाददायक व मंत्रामुग्ध केले...
दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाधान गाजरे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहशिक्षक राम मोकळे यांच्या सहकार्याने क्रिकेट चे प्रशिक्षण देण्यात आले,त्यामध्ये मुलांसह व मुलींनाही गोलंदाजी, फलंदाजी,क्षेत्ररक्षण यासह क्रिकेट मधील अनेक पैलुंचे प्रशिक्षण देण्यात आले..
सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक सचिव अंकुश गाजरे, संस्थापक उपाध्यक्ष अजित लोकरे यांनी काटेकोर नियोजन केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहशिक्षक मयूर भूमकर,कबीर शेख, सौ.मनिषा गोरे,सौ.तृप्ती कोरे, दिपाली कुंभार,प्रियांका गाजरे,ऐश्वर्या भाईक,अश्विनी यलमार,सौ.भिंगारे,अस्मातारा शेख,सौ.अदिती देठे,सौ.बाबर, सौ.भुमकर इत्यादी सर्वांनी अथक परिश्रम घेतले.