जोगेश्वरी प्रतिनिधी उदय वाघवणकर तेज न्यूज
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जोगेश्वरी - पूर्व विधानसभेतील भूमी वैष्णवी प्रतिष्ठान यांच्या वतीने बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर रक्तपेढी यांच्या सहकार्याने दिनांक - 29 जून रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमाला आमदार अनंत (बाळा) नर यांनी उपस्थित राहून रक्तदात्यांचे कौतुक केले.आणि समाजकार्याची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली.याप्रसंगी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.